#महाप्रसादाचे आयोजन !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
झाडअंकले ( ता.खानापूर ) गावचे ग्राम दैवत भुतनाथ देवाच्या यात्रेला सालाबाद प्रमाने यंदाही मंगळवारी दि. १६ रोजी प्रारंभ झाला.
या वेळी मानकर्याच्या ओटी, नैवेद्य व पुजा होऊन इंगळ्याचा कार्यक्रम पार पडला. भाविकानी भुतनाथ देवाच्या दर्शनसाठी मोठी गर्दी केली होती.
मंगळवारी भुतनाथ डोगरावर महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले.त्या साठी भाविकानी मोठी गर्दी केली होती, दुपारी २ वाजल्या पासुन सायंकाळी उशीरापर्यत प्रसादाचे वाटप सुरू होते.
महाप्रसादासाठी खानापूर तालुक्यातील विविध खेड्यातील भाविक तसेच बेळगाव तालुक्यातील भाविक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
उद्या बुधवारी दि.१७ डिसेंबर रोजी यात्रेचा दुसरा दिवस आहे. यात्रेनिमित्त झाड अंकले गावाात विधुत रोषणाई व सजावट केले होते.
यात्रे निमित्त उद्या बुधवारी दि.१७ रोजी रात्री १० वाजता कोल्हापुर येथील सारेगामा आर्केस्ट्रा यांचा “सगळी नाती स्वार्थासाठी” हा नाट्यप्रयोग होणार आहे.तरी भाविकानी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन झाडअंकले ग्रामस्थ व भुतनाथ यात्रा कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
