#रिया पाटील प्रस्तुत ” वॆड घुंगराचे ” डी जे शो . रात्री ९ वाजता!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
फुलेवाडी (डुक्करवाडी) ता .खानापूर येथील ग्राम देवता श्री कुटी माऊली मंदिराच्या अहिल्या वर्धापन दि ना निमित्त मंगळवारी दि.१६ रोजी सकाळी ९ वाजता श्रीकुटी माऊली देवीला अभिषेक त्यानंतर सत्यनारायण पुजा ,पंच कमिटी
,ग्रामस्थांच्यावतीने महापुजा ,देवीची ओटी भरणे,व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्त मंगळवारी रात्री ९ वाजता रिया पाटील प्रस्तुत ” वेड घुंगराचे ” डी जे शो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नाना पाटील उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे उदघाटन धोडीबा कुंभार करणार आहेत.
दीप प्रज्वलन गुंडू कुंभार, सौ .,उज्वला भैरू कुंभार ग्रा.पं.उपाध्यायक्षा हलकर्णी , सदस्य प्रवीण अगणोजी,रवी मादार,रायापा पाटील, जोतिबा कुंभार,कल्लापा कुंभार,लक्ष्मण कुंभार आदीच्याहस्ते तर विविध फोटोचे पूजन यल्लापा कुंभार, संजय कुंभार, सातेरी कुंभार, नंदकुमार कुंभार, रमेश कुंभार, मोहन कुंभार, नारायण कुंभार आदीच्याहस्ते होणार आहे.तरी कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन पंच कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.