संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मुुळची गोदगेरी (ता .खानापूर ) गाव ची कन्या सध्या खानापूर देसाई गल्ली येथे वास्तव्यास असलेली कुमारी सानवी सदानंद जांबोटकर देसाई ( वय ९) हिचे रविवारी दि.७ रोजी रात्री १२ वाजता निधन झाले.
खानापूर स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीय स्कूल मध्ये दुसरीच्या वर्गात शिकणारी सानवी हिचा १५ आँगष्ट रोजी शाळेतुन घरी येताना पाय पॅक्चर झाल्याचे निमित्त झाले.लागलीच तिच्यावर खानापूर आशिर्वाद हाॅस्पिटलमध्ये उपचार घेतले.त्यानंतर बेळगाव विजया हाॅस्पिटलमध्ये आँगष्टपासुन उपचार सुरू होते.त्यानंतर बेळगाव के एल ई हास्पिटल मध्ये उपचार सुरू करण्यात आले.
नुकताच दि. ४ डिसेंबर रोजी तिच्यावर उपचार करण्यात आले.व लवकरच आपरेशन करण्यात येणार होते. मात्र रविवारी दि.७ रोजी रात्री अचानक तब्येत बिघडली. काहीवेळा किला उलटी जुलाब झाला.लागलीच खानापूर सरकारी दवाखाण्यात दाखल करण्यात आले.मात्र उपचार दरम्यान तिचा मृत्य झाला.
तिचे वडिल हे नोकरीनिमित्त दुबईला आहेत.
तिच्या मृत्यूने गोदगेरी गावावर शोककळा पसरली.
सानवीच्या पश्चात आई, वडील,
भाऊ,आजाआजी, काका काकू असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन मंगळवारी सकाळी ८ वाजता गोदगेरी येथे होणार आहेत.