#मयेकरनगरात सी सी रोड कामाचा शुभारंभ !
“ग्रा.पं.च्या मयेकरनगरात मलनाड योजनेतुन सी सी रोड तर लागुन असलेल्या विद्यानगरात निधी मंजुर झाल्यानंतर?”
आम. हलगेकर.
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
रामगुरवाडी ( ता.खानापूर ) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मयेकर नगरात आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याप्रयत्नातुन मलनाड योजनेंर्तगत सी सी रोडसाठी ३५ लाखाचा निधी मंजुर करून शुक्रवारी दि ५ डिसेंबर रोजी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला.
या वेळी बोलता ना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले की , खानापूर शहराला लागुन असलेल्या मयेकर नगरात गेल्या अनेक वर्षापासुन रस्त्याची समस्या सुटली नाही, याहुन लागुन असलेल्या खानापूर नगरपंचायतीच्या हद्दीत असलेल्या विद्यानगरात गेल्या २५ वर्षापासुन रस्ते, गटारी झाली नाहीत. ही मोठी समस्या आहे.
मात्र ग्रामीण भागासाठी मलनाड योजनेतुन मयेकरनगरातील रस्त्याच्या सी सी रोड ३५ लाखाचा निजी मंजुर झाला. आणि शहरापेक्षा खेड्यातील मयेकरनगरातील रस्त्याचे भाग्य उजळले.
आता विद्यानगरातील रस्त्यासाठी अल्पसंख्यक निधीतुन निधी मंजुर करून भविष्यात रस्त्याचे काम होणार तो पर्यत वाट पाहावी लागणार आहे.
असे मत आमदार विठ्ठल हलगेकर यानी रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
या वेळी बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्याक्ष प्रमोद को चेरी, तालुका भाजपा माजी अध्यक्ष संजय कुबल, सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, नगरसेवक नारायण मयेकर, ग्राम पंचायत सदस्या सौ ऐश्वर्या मयेकर, शिवा मयेकर, ग्राम पंचायत माजी सदस्य रमेश पाटील,एल. डी. पाटील ,पी. सी. पाटील, के.बी . गावडा,खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर,रवि बडगेर, पी एन देसाई व मयेकर नगरातील नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी रमेश पाटील यानी प्रस्तावित केले. तर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार विठ्ठल हलगेकर, प्रमोद कोचेरी, संजय कुबल, नारायण मयेकर आदीच्याहस्ते करण्यात आला.
या वेळी कार्य क्र माला मयेकर नगरातील नागरिक, महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सी डी पी कार्यालयाजवळील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा.!
मयेकरनगरात जाणरा रस्ता हा खानापूर जांबोटी महामार्गावरून सी डी पी कार्यालयाजवळून जातो. त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न लावुन रस्त्याचे सुध्दा डांबरीकरण व्हावे.अशी मागणी केली.
