” २० वर्षानंतर मयेकरनगरत रस्त्याची समस्या मार्गी लागली”
संदेश क्रांती न्यूज :

खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराला लागुन असलेल्या उपनगरातील मयेकरनगरात गेल्या पंधऱा वर्षापासुन रस्ते, गटारीसाठी को क्या ही आमदाराने जाणीव पूर्वक लक्ष दिले नाही. त्यामुळे मयेकरनगरातील रहिवाशाना गेल्या अनेक वर्षापासुन रस्ता, गटारीच्या समस्यानी त्रस्त असलेल्या रहिवाशाना गेल्या २० वर्षाच्या काळानंतर भाजप पक्षाचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी जाती ने लक्ष देऊन मयेकरनगरात सी सी रोड मंदिर करून कामाची सुरूवात केली. त्याची पाहणी आमदार विट्ठलराव हलगेकर यानी बुधवारी दि.३ रोजी भेट देऊन केली.
याभेटी प्रसंगी आमदार विट्ठलराव हलगेकर याच्यासह बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी , खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर ,शिवा मयेकर, बसवराज पाटील ,पी.एन.देसाई, अँड मुल्ला, रामचंद्र पाटील, तसेच मयेकर नगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मयेकरनगरात सी सी रोड झाल्याने नागरीकातुन गेल्या २० वर्षा पासुनची समस्या मार्गी लागली . यामुळे नागरीकातुन समाधान पसरले आहे.
