उचवडे ( ता. खानापूर ) गावच्या कै.सौ. अनुसया लक्ष्मण बामणे यांचे
22 नोव्हेंबर 2024 रोजी निधन होऊन.आज एक वर्ष झाले. आजच्या प्रथम स्मृती दिनी त्यांच्या विषयी थोडेसे…..
आईचा जन्म खानापूर तालुक्यातील मास्केनहट्टी गावामध्ये एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला.त्यांच्या आईचे नांव लक्ष्मी व वडिलांचे नांव शांताराम पाटील होय. इ.स.1998 मध्ये उचवडे गावातीलच एक प्रतिष्ठित व्यक्ती श्री.लक्ष्मण बामणे यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
सर्वांशी प्रेमाने वागणे, आले गेलेल्यांचा पाहुणचार करणे, असा त्यांचा स्वभाव होता. पती राजकारणात असल्यामुळे राजकारणाचे धडे त्यांना जवळुन मिळाले.
त्यामुळेच त्यांनी सन 2021 मध्ये बैलूर ग्रामपंचायतीच्या उंचवडे गावातून निवडणूक लढवून बैलुर ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या. अडीच वर्षाच्या काळात त्यांनी पतीच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात चांगला ठसा उमटला. ग्रामपंचायत विकास कामात त्यांनी प्रगती केली. ग्रामपंचायतच्या माध्यमातून बैलूर तसेच उचवडे गावात विकासाची गंगा आणली. यामागे पती लक्ष्मण बामणे यांचे मोठे सहकार्य लाभले.त्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
संसारात प्रामाणिकपणे सेवा करत आपल्या मुलांना उच्चशिक्षित करण्याची जिद्द मोठी होती.
आज त्यांच्या पश्चात पती लक्ष्मण बामणे हे माजी जिल्हापंचायत सदस्य जांबोटी व माजी सभापती तालुका पंचायत खानापूर म्हणून सेवा केली. तसेच आज हनुमान मल्टि.को. ऑप सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून सेवा बजावत आहेत.
दोन मुलगे कु अनंत व कु. आकाश आपल्या कामात कार्यरत आहेत. मुलगी सौ रेणुका आपल्या संसारात कार्यरत आहे. व कु. सुजाता वडिलांच्या पाठीशी राहून घर काम पाहते.
तुझ्या जाण्याने आमच्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती कधी भरून न येणारी आहे. तुझ्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!
तुझी मुलगी कु. सुजाता.