“जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड”
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्थेच्या खानापूर तालुक्यातील शिवठाण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकताच खानापूर येथील सर्वोदय इंग्लिश मीडियम स्कूल येथे घेण्यात आलेल्या खानापूर. तालुका माध्यमिक शाळांच्या विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावून यश संपादन केले आहे.
या विज्ञान प्रदर्शनात शिवठाण हायस्कूलचा विद्यार्थी पार्थ रामा इसरानी याने एक्सीडेंट प्रिव्हेन्टेशन मशीन हा प्रयोग सादर करून आपल्या प्रयोगाचा उत्कृष्ट नमुना सादरीकरण करून विजय संपादन केला. त्याला विज्ञान शिक्षक विलास पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. तर मुख्याध्यापक पी ए पाटील व इतर शिक्षकांचे सहकार्य लाभत आहे.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 38 हायस्कूलनी सहभाग दर्शवला होता.
विद्यार्थी पार्थ इसराणी याने विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल श्री चांगळेश्वर शिक्षण संस्थेचे चेअरमन वाय. एन. मजुकर व सेक्रेटरी प्रसाद मधुकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या यशामुळे विद्यार्थी पार्थ इसराणी याचे खानापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
