सौ . भागीरथी यशवंत पाटील यांचे निधन
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
शिंदोळी (ता. खानापूर) येथील रहिवासी सौ. भागीरथी यशवंत पाटील ( वय.८०) यांचे शनिवार दिनांक 15 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित चिरंजीव, व एक विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे.
शिंदोळी येथील निवृत्त मुख्याध्यापक वाय. एम.पाटील यांच्या त्या पत्नी होत.
तसेच शिंदोळी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य राजेश पाटील यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांची अंत्यविधी आज शनिवारी सायंकाळी सात वाजता शिंदोळी येथे होणार आहे.