संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याचे तहसीलदार दुंडप्पा कोमार यांची बदली करण्यात आली असून. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बदलीचे आदेश जारी केले आहेत. या आदेश नुसार खानापूर तालुक्याच्या तहसीलदार म्हणून मंजुळा के. नायक यांची नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
तहसीलदार दुंडापा कोमार त्यांच्यावर कारवाई एका शेतीसंबंधी प्रकरणातून उदभवली आहे. संबंधित प्रकरणातून उच्च न्यायालयाने सर्वे करण्याचे स्पष्ट अभिजित दिले होते मात्र तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी ते आदेश बजावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे न्यायालयाच्या निर्देशनास आले. त्यानंतर कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याच्या कारणावरून उच्च न्यायालयाने सहा दिवसाच्या आत त्यांच्या बदलीचे आदेश देण्याची निर्देश सरकारने दिले होते.
न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्याने तात्काळ कारवाई करत कोमार यांच्या बदलीचे आदेश जारी केले. त्यांच्या जागी कार्यतत्पर अधिकारी श्रीमती मंजुळा के. नायक यांची खानापूर तालुका तहसीलदार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर नूतन तहसीलदार मंजुळा के नायक यांनी पदभार स्वीकारला.
यावेळी उप तहसीलदार एस के तंगोळी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.