#तृतीय क्रमांकसह ब्राँझ मेडल!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर मराठा मंडळ सेकंडरी स्कूलची कुस्ती पटू कुमारी तनुजा रवींद्र गुरव हिने नुकताच कर्नाटकातील होस्पेट येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये 49 किलो वजनी गटात भाग घेऊन 1400 स्पर्धकांमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तिला ब्रांज मेडल व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले.तिच्या या यशाबद्दल खानापूर तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.
तनुजा गुरव हिला बेळगाव मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ . राजश्री नागराज यांचे प्रोत्साहन मिळत आहे.व संस्थेचे संचालक परशराम गुरव, शिवाजीराव पाटील यांची प्रेरणा तसेच शाळेचे मुख्याध्यापक के.व्ही. कुलकर्णी , क्रीडा शिक्षक चंद्रकांत गोमानाचे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
