“शेतकऱ्यांच्या ऊसाला 3500रुपये प्रति टन दर द्यावा. “
#महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष सावित्री मादार!
#अखिल कर्नाटक रयत संघ खानापूर यांच्यावतीने रास्ता रोको!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
शेतकऱ्यानी काबाडकष्ट करून आपल्या शेतात उसाची लागवड केलेली आहे. स्वतःच्या मुलाप्रमाणे ऊस पिकाची जोपासणा केली आहे. त्या शेतकऱ्याच्या ऊसाला 3500 रुपये प्रति टन दर द्यावा.ऊस तोडणी घटाने फक्त कारखान्याकडून ऊस तोडणीसाठी मिळणारे अधिकृत पैसे घ्यावेत. कारखाना मधील वजन काट्यावर होणारी दोन टनापर्यंतची काटेमारी थांबवावी. अशा प्रकारच्या गैर प्रकारांमध्ये दोषी कारखान्यावर कायदेशीर कारवाई करावी. ऊस वाहतुकीसाठी टोल नाका घेऊ नये. अशी मागणी काँग्रेस तालुका महिला अध्यक्ष सौ सावित्री मादर यांनी सोमवारी दि. 3 रोजी जांबोटी क्रॉस वर अखिल कर्नाटक रयत संघटनेच्या खानापूर शाखेच्या वतीने आयोजित रास्ता रोको कार्यक्रमात केली.
यावेळी अखिल रयत संघ राज्य उपाध्यक्ष किशोर मिठारी यांनी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले . व रास्ता रोको चा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी आडवेश सिद्धेश्वर स्वामी,जीडीएस चे नेते नासिर बागवान, अशोक यमकनमर्डी, गुरुलिंगय्यास्वामी हिरेमठ, दत्ता बिडकर, मल्लाप्पा भरणट्टी, यल्लाप्पा चन्नापूर, भाऊसाहेब पाटील किणये, जोतिबा भेंडीगिरी आधी उपस्थित होते.
फोटो पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी बोलताना जीडीएस नेते नासिर बागवान म्हणाले की,ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळाला पाहिजे, यासाठी प्रति टन 3500 रुपये दर घोषित करावा. तसेच कारखान्यास कडून होणारी काटेमारी व वाहतुकीतील अन्यायकार थांबवावी. यासाठी अखिल कर्नाटक रयत संघाच्या खानापूर शाखेच्या वतीने रास्त रोखला माझा संपूर्ण पाठिंबा आहे.
यावेळी अखिल कर्नाटक रयत संघाचे राज्य उपाध्यक्ष किशोर मिठारी म्हणाले की, शेतकऱ्यानी काबाडकष्ट करून ऊस उत्पादन करत आहेत. त्याला एक टन ऊस उत्पादनासाठी 2500 रुपये खर्च येतो.परंतु कारखानदार केवळ 2500 ते 3000 इतकाच दर दिला जातो. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, खत ,औषध तसेच मजुरांचे वाढते दर लक्षात घेऊन सरकारने 3500 रुपये प्रति टन दर द्यावा. अशी मागणी केली .
यावेळी ते पुढे म्हणाले की,
शेतकऱ्याच्या उसाला प्रति टन 3500 रुपये दर घोषित करावा. ऊस तोडणी घटाने फक्त कारखान्याकडून ऊस तोडणीसाठी मिळणारे अधिकृत पैसे घ्यावेत. कारखाण्या मधील वजन काट्यावर होणारी दोन टनापर्यंतची काटेमारी थांबवावी. अशा प्रकारच्या गैर प्रकारांमध्ये दोषी कारखान्यावर कायदेशीर कारवाई करावी. ऊस वाहतुकीसाठी वापरणाऱ्या ट्रकवर टोल नाक्यावरील कर माफ करावा.
यावेळी खानापूर तालुक्याचे तहसीलदार धोंडाप्पा कोमार, सीपीआय लालसब गवंडी, पोलीस बंदोबस्तात उपस्थित होते.
जाबोटी क्रॉस वर वाहतूक ठप्प!
सोमवारी दुपारी अखिल कर्नाटक रयत संघ खानापूर संघटनेच्या वतीने आयोजित रास्ता रोको मुळे जांबोटी क्रॉस वर वाहतूक बराच उशीर ठप्प झाली होती.
बसेस व इतर वाहतुकांच्या रांगा लागल्या होत्या. अखिल कर्नाटक रयत संघ खानापूर शाखेच्या वतीने उसाचा दर साडेतीन हजार प्रति टन दिल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही. असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी लैला साखर कारखान्याच्या वतीने एम डी. सदानंद पाटील म्हणाले की इतर साखर कारखाने जो दर देतील तोच दर आम्ही देऊ असे सांगितले. यावेळी अरुळी मठाचे स्वामी चन्न बसू देवरू,लैला साखर कारखान्याचे संचालक चांगप्पा निलजकर, बाळगौडा पाटील इतर संचालक तसेच कारखान्याचे अधिकारी बाळासाहेब शेलार उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार धुंडाप्पा कोमार यांना अखिल कर्नाटक रयत संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
