#तीन नोव्हेंबरला रस्ता रोको चा इशारा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळाला पाहिजे यासाठी प्रति टन 3500 रुपये दर घोषित करावा तसेच कारखान्यास कडून होणारी काटेमारी व समोर तोडणे व वाहतुकीतील अन्यायकार थांबवावी यासाठी अखिल कर्नाटक रयत संघाच्या वतीने खानापूर तालुक्यात शेताच्या बांधावरून शेतकऱ्यांनी मागणी केली.
यावेळी अखिल कर्नाटक रयत संघाचे पदाधिकारी किशोर मिटारी म्हणाले की, शेतकऱ्यानी काबाडकष्ट करून ऊस उत्पादन करत आहेत. त्याला एक टन ऊस उत्पादनासाठी 2500 रुपये खर्च येतो परंतु कारखानदार केवळ 2500 ते 3000 इतकाच दर दिला जातो. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, खत ,औषध तसेच मजुरांचे वाढते दर लक्षात घेऊन सरकारने 3500 रुपये प्रति टन दर द्यावा अशी मागणी केली .
यावेळी ते पुढे म्हणाले की,
शेतकऱ्याच्या उसाला प्रति टन 3500 रुपये दर घोषित करावा. ऊस तोडणी घटाने फक्त कारखान्याकडून ऊस तोडणीसाठी मिळणारे अधिकृत पैसे घ्यावेत. कारखाना मधील वजन काट्यावर होणारी दोन टनापर्यंतची काटेमारी थांबवावी. अशा प्रकारच्या गैर प्रकारांमध्ये दोषी कारखान्यावर कायदेशीर कारवाई करावी ऊस वाहतुकीसाठी वापरणाऱ्या ट्रकवर टोल नाक्यावरील कर माफ करावा.
वरील मागण्यावर येत्या पाच दिवसात सरकारने निर्णय घेतला नाही तर येत्या तीन नोव्हेंबर रोजी खानापूर येथे कालगुप्पा बेळगाव राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
यावेळी शेताच्या बांधावर रयत संघाचे पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

