“कालमणी क्रॉसवर प्रकाश पाटील रेस्टॉरंटचे शानदार उद्घाटन”
खानापूर तालुका ब्लॉक अध्यक्ष अँड ईश्वर घाडी त्यांनी दिल्या शुभेच्छा!
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील जांबोटी चोर्ला महा मार्गावरील कालमणी क्रॉसवर माजी के डी पी मेंबर प्रकाश पाटील यांच्या मालकीच्या पाटील रेस्टॉरंटचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी पार पडला.
यावेळी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांनी उपस्थित दर्शवली होती. यानिमित्त माजी के डी पी मेंबर प्रकाश पाटील यांनी उभारलेल्या रेस्टॉरंट ला भेट दिली. आणि माजी केडीपी मेंबर प्रकाश पाटील यांचा शाल पुष्पहार घालून सत्कार केला.
जांबोटी चोर्ला महामार्गावरील कालमणी क्रॉसवर उभारलेल्या पाटील रेस्टॉरंटची पाहणी केली. व महाप्रसाद घेतला. यावेळी खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी खानापूर तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी म्हणाले की, माजी केडीपी मेंबर प्रकाश पाटील यांनी जांबोटी चोर्ला महामार्गावरील कालमणी क्रॉसवर पाटील रेस्टॉरंट उभारल्याने महामार्गावरून येजा करणाऱ्या प्रवासी वर्गाला विश्रांतीसाठी तसेच भोजनासाठी चांगली सोय झाली आहे. या महामार्गावरून बेळगाव सह गोवा राज्यातील प्रवासी नेहमी ये जा करतात. त्यामुळे प्रवासी वर्गाला याचा लाभ होणार आहे.