#नंदगडात जागृती फेरी निमित्त म.ए. समितीचे आव्हान!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गेल्या 68 वर्षापासून सीमा वासियावर कर्नाटक सरकारने चालवलेल्या अन्यायाविरुद्ध न्याय हक्कासाठी लढत आहे. आपला लढा न्याय मिळेपर्यंत सुरू राहील. त्यासाठी मराठी भाषिक आणि एक नोव्हेंबर रोजी काळ्या आपले व्यवहार बंद ठेवून सरकारचा निषेध नोंदवावा. असे आव्हान बुधवारी (या.२९) रोजी नंदगड येथील जागृती फेरीत खानापूर म.ए. समितीच्या वतीने करण्यात आले.
यावेळी नंदगड बाजारात व गावात जनजागृती करण्यात आली यावेळी समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी पत्रके वाटून खानापूर येथील शिवस्मारकात एक दिवशी धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
यावेळी खानापूर म.ए. समितीचे अध्यक्ष गोपाल देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, समिती नेते प्रकाश चव्हाण, प्रवीण पाटील मोहन गुरव बम्हानंद पाटील, रुमाण्णा झुंजवाडकर, राजाराम देसाई, डी.एम. भोसले, विठ्ठल गुरव, ज्ञानेश्वर बिडकर आदी उपस्थित होते.

