#जिल्हाधिकाऱ्यासह तहसीलदारांना निवेदन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील खानापूर, लोंढा,
जांबोटी, त्याचबरोबर कित्तूर तालुक्यातील काही जंगल भागात जनावरे चारण्यासाठी जंगल भागात राहुन दूध व्यवसाय करून धनगर गवळी समाज आपला उदरनिर्वाह करत आहेत.
दूध व्यवसाय आमचा प्राथमिक व्यवसाय आहे व्यवसाय आहे. जंगल भागात राहिल्यामुळे शिक्षणापासून दूर राहून अनेक मूलभूत सुविधा पासून वंचित राहिला आहे.
जिल्ह्यात छत्तीस गावा पैकी 18 गावे घनदाट जंगलात वसलेली आहेत. पाच गावात अजून वीज पुरवठा नाही. 25 हून आधी गावात अद्याप रस्ते, पिण्याचे पाणी, अंगणवाडी, शिक्षणाची व्यवस्था नाही आहे. सरकारी सुविधा अद्याप झाल्या नाहीत. धनगर गवळी समाजातील विद्यार्थी शिक्षणासाठी धडपडत असतात त्यांना वस्तीग्रह मध्ये प्रवेश द्यावा. धनगर गवळी समाजासाठी एक समुदाय भवन बांधून द्यावे. आमचा समाज केवळ बेळगाव जिल्ह्यातच धनगर म्हणून वर्गीकृत आहे. इतर जिल्ह्याप्रमाणे श्रेणी एक मध्ये गवळी म्हणून समावेश करावा. व जात प्रमाणपत्र द्यावे. धनगर समाजातील नागरिक अशिक्षित असल्याने रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदार यादीत अनेक चुका झाल्याने वृद्ध वेतन व इतर सरकारच्या योजना मिळत नाहीत. याची दखल घेऊन सरकारच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अशा मागणीचे निवेदन एम एल सी शांताराम सिद्धी यांच्या नेतृत्वाखाली धनगर गवळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, तहसीलदार धोंडप्पा कोमार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना धनगर समाजाचे गंगाराम बावदाने, वाघू पाटील, बापू बावदाने, सामाजिक कार्यकर्ते भैरू पाटील, नवलू आवणे, सजन पाटील तुकाराम थोरवत, बामू आडोळकर, मनोज कोलोपटे, विठ्ठल शिंदे, साजू पाटील, रामू येडगे सह अनेक धनगर गवळी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणि यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून
समस्या सोडण्याचे आश्वासन दिले.