“#खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांच्या नेतृत्वाखाली “!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
राष्ट्रीय निवडणूक आयोग ही देशाची स्वायक्त संस्था आहे. निवडणूक आयोगाने निपक्ष पणे काम करणे गरजेचे आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून निवडणूक आयोग संविधानाच्या मार्ग सूची प्रमाणे काम करत नसल्याने देशात वेगवेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले.याबाबत काँग्रेसचे नेते राष्ट्रीय विरोधी पक्षानेते राहुल गांधी यांनी होट चोरीचा मुद्दा सादर करून निवडणूक आयोगाची ओळख केली आहे. देशात काँग्रेसच्या वतीने सह्यांची मोहीम हाती घेतले आहे.
यानिमित्त खानापूर काँग्रेस तालुकाध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी खानापुर तालुक्यातील कणकुंबी येथून सह्यांची मोहीम राबविण्यास सुरुवात आली आहे. पारवाड, चिगुळे,तोराळी, चापोली, तसेच जांबोटी, ओलमणीसह अनेक खेड्यातील नागरिकांना भेटून त्यांना याविषयी माहिती देऊन सह्यांची मोहीम हाती घेतली.
यावेळी खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी बोलताना म्हणाले की निवडणूक आयोगाने निपक्षपणे निवडणूक काम करणे गरजेचे आहे. मात्र निवडणूक आयोग संविधानाच्या मार्ग सुची प्रमाणे काम करत नसल्याने काँग्रेसचे नेते , राष्ट्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी होट चोरीचा मुद्दा घेऊन देशभर सह्यंची मोहीम हाती घेतले आहे. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी व इतर नेते ही मोहीम राबवत आहेत असे सांगितले.
खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांच्या नेतृत्वाखाली तालुका ग्रामपंचायत सदस्य युनियनचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, दीपक कवठनकर, राजू पाटील,यांच्यासह. कणकुंबी गावचे कृष्णा नाईक, उमेश गावडे गोपाळ नाईक राजन कुडतुरकर, मुस्ताक डंबलकर सह काँग्रेसचे अनेककार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
