#खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांचा पुढाकार”!
संदेश कांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
राष्ट्रीय निवडणूक आयोग ही देशाची स्वायक्त संस्था आहे. निवडणूक आयोगाने निपक्ष पणे काम करणे गरजेचे आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून निवडणूक आयोग संविधानाच्या मार्ग सूची प्रमाणे काम करत नसल्याने देशात वेगवेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले.याबाबत काँग्रेसचे नेते राष्ट्रीय विरोधी पक्षाने राहुल गांधी आणि होट चोरीचा मुद्दा प्रवेशी सादर करून निवडणूक आयोगाची ओळख केली आहे देशात काँग्रेसच्या वतीने सह्यांची मोहीम हाती घेतले आहे.
यानिमित्त खानापूर काँग्रेस तालुकाध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांच्या नेतृत्वाखाली खानापुर तालुक्यातील बिडी येथून सह्यांची मोहीम राबविण्यास सुरुवात आली आहे. तिथून कक्केरी, नागरगाळी , हलशी, हलगासह अनेक गावे खेड्यातील नागरिकांना भेटून त्यांना याविषयी माहिती देऊन सह्यांची मोहीम हाती घेतली.
यावेळी खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांच्यासह काँग्रेस च्या दीपा पाटील, अँड . पी एन बाळेकुंद्री, राजू पाटील शिंदोळी, शशांक पाटील संदीप शेबले. बिडी येथून मुतवली मुगूटसाब, संतोष शेट्टी, शांताराम शेट्टी जमीर शमेर, विष्णू कलाल दस्तगीर नाईक सिराज हट्टीहोळी शरीफ पठाण आदी अनेककार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
