#सायकल फेरी काढून केली स्वच्छता जागृती!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
मराठा मंडळ शिक्षण संस्था संचालित खानापूर शहरातील मराठा मंडळ हायर सेकंडरी स्कूलच्या एन् सी सी छात्रा कडून महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी एन् सी सी छात्र व एन् सी सी ऑफिसर पी. पी. काशीद यानी शाळेपासून सायकल फेरी काढून जनतेला स्वच्छता अभियानाची जनजागृति करण्यात आली.
प्रारंभी मराठा मंडळ हायर सेकंडरी हायस्कूलमध्ये 2 ऑक्टोंबर गांधी जयंती निमित्त महात्मा गांधींच्या व लालबहादूर शास्त्री यांच्या फोटोचे पूजन मुख्याध्यापक के व्ही कुलकर्णी यांनी केले.
यावेळी हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
मराठा मंडळ संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा श्रीमती राजश्रीताई नागराजू यांचे प्रोस्ताहन लाभत आहे .तसेच संस्थेचे संचालक परशूरामअण्णा गुरव व शिवाजीराव पाटिल यांच्या सदिच्छा आणि शाळेचे मुख्याध्यापक के. व्ही . कुलकर्णी आणि शाळेच्या सर्व शिक्षकांचे व कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले