#दुर्गादेवीचे घेतले दर्शन !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील श्री शाहूनगरात सालाबाद प्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गादेवीचा उत्सव साजरा करण्यात आला.
शेवटच्या दिवशी माजी आमदार व ए.आय.सी. सचिव डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी खानापूर शहरातील श्री शाहू नगरातील दुर्गादेवी मंडळाला भेट देऊन दुर्गा देवीचे दर्शन घेतले. व आरती आरती ओवाळून कार्यक्रमात सहभाग दर्शविला.
कार्यक्रमाच्या औचित्य साधून माजी आमदार व ए.आय.सी.सी .सचिव डॉक्टर अंजली निंबाळकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार व ए आय सी सी सचिव डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाहूनगर मधील नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते राजू कुडाळे, राजू सोनटक्के, आकाश सारे, विष्णू सोनटक्के,किशोर कुडाळे,रोहीत कुडाळे,राम सोनटक्के,तसेच इतर सर्वजण, तसेच महिला मंडळ, युवक वगैरे उपस्थित होते.
🚩जय खानापूर 🚩
