#नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. मीनाक्षी बैलूरकर , नगरसेवक प्रकाश बैलूरकर यांची उपस्थिती.!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी:
गेल्या ९ दिवसापासून नवरात्रोत्सव निमित्त खानापूर शहरासह उपनगरात दुर्गामाता दौडीला उत्साहात स्वागत होत आहे.
खानापूर शहरातील चव्हाटा मंदिर निंगापूर गल्लीत पहाटे दुर्गामाता दौडचे
स्वागत करण्यात आले.
यावेळी चव्हाटा मंदिर निंगापूर गल्लीतील नागरिकांनी गल्लीत भगव्या पताका तसेच घरासमोर रंगीत रांगोळ्या घालून दौंडीचे आयोजन केले होते.
यावेळी खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. मीनाक्षी बैलूरकर, त्यांचे पती नगरसेवक प्रकाश बैलूरकर यांची प्रमुख उपस्थित होती.
दुर्गा मातेची दौड येताच सुहासिनीने आरती ओवाळून स्वागत केले. दुर्गामाता दौड मध्ये मावळ्याने भगवा फेटा आणि पांढरा पोशाख परिधान केला होता.
यावेळी खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. मीनाक्षी बैलूरकर व नगरसेवक प्रकाश बैलुरकर यांच्या हस्ते शिव पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तर नगराध्यक्षा सौ मीनाक्षी बैलुरकर यांच्या हस्ते आरती ओवाळून दौडीचे स्वागत करण्यात आले
प्रारंभी पहाटे साडेपाच वाजता खानापूर शिवस्मारकातून दौडीला प्रारंभ झाला होता. दौडीच्या मार्गावरून प्रेरणा मंत्र दुर्गामातेचे नामस्मरण कीर्तन अभंग सादर करण्यास विविधतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या स्वागत करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रत्येक घरासमोर रांगोळी काढण्यात आल्या होत्या. यावेळ चव्हाटा मंदिर निंगापूर गल्ली येथील पंच कमिटीचे मोहन गोरल, संजय सडेकर, गणपती चव्हाण, प्रदीप दलाल, निलेश सडेकर, महिला मंडळ नागरिक, महिला व बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

