“आशीर्वाद हॉस्पिटल यांच्या सौजन्याने!”
#400 पोलिसांनी घेतला लाभ!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील दुर्गा नगर येथील पोलीस ट्रेनिंग सेंटर मध्ये आशीर्वाद यांच्या सौजन्याने नुकताच आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.
या शिबिरात खानापूर पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या 400 पोलिसांचा सहभाग होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानापूर पोलीस ट्रेनिंग सेंटरचे प्रिन्सिपल अस्मिद गोंडेला (एस.पी) उपस्थित होते. तर व्यासपीठावर डीवायएसपी निलंगा होलेकर, डी वाय एस पी निंगाप्पा नायक, डॉक्टर देवेगौडा, खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर डी . ई. नाडगौडा, डॉक्टर मदन कुंभार, डॉक्टर विनोद माली आधी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर डी इ. नाडगौडा बोलताना म्हणाले की पोलीस हा समाजाचा मित्र आहे. त्यांना 24 तास डोळ्यात तेल घालून समाजाला संरक्षण देण्याचे काम करतात. त्यामुळे पोलिसांचे आरोग्य मजबूत असणे गरजेचे आहे. पोलिसांची प्रकृती चांगली असेल तर ते रात्रंदिवस सेवा करण्यास सज्ज राहतात. त्यासाठी खानापुरातील आशीर्वाद हॉस्पिटलच्या माध्यमातून खानापूर पोलीस ट्रेनिंग सेंटर मधील जवळपास 400 पोलिसांचे नेत्र तपासणी, हाडांचा आजार, व इतर आजाराबद्दल तपासणी करण्यात आली.
यावेळी डॉक्टर देवेगौडा यांनी पोलिसांना आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. आपली तब्येत सांभाळून जन सेवा करावी असे आव्हान केले.
यावेळी आशीर्वाद हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्स व स्टॉप मेंबर यांनी आरोग्य तपासणी शिबिरा साठी परिश्रम घेतले.
खानापूर पोलीस ट्रेनिंग सेंटर मधील 400 हून अधिक पोलिसांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.