संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील
श्री शाहू नगर येथे मंगळवारी दि.३० रोजी नवरात्रोत्सवा निमित्त श्री माऊली माता महाआरती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ मिनाक्षी बैलूरकर, नगरसेवक प्रकाश बैलूरकर, भाजपा नेते राजेंद्र रायका समाजसेवक मंजूनाथ परमेकर, आनंद पाटील, राजू कुडाळे, राज सोनटक्के, दिलीप सोनटक्के,के .डी. पाटील, अजय सोनटक्के, श्रवण सोनटक्के, सर्व भक्तगण उपस्थित होते.
या श्री माऊली महा आरतीला नागरिक, महिला वर्ग तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते