संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक गुरुवार दि. २५ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आलेली आहे. तरी म. ए. समितीचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांनी वेळेत हजर रहावे . असे आवाहन खानापूर तालुका म ए समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील व निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी आदींनी केले आहे.
