खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका सकल मराठा समाजातर्फे उद्या शनिवार दि. २० रोजी सकाळी ११ वा. भाग्यलक्ष्मी सहकारी सोसायटी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेत मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार असून, समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. तसेच समाजहितासाठी राबविण्यात येणारे उपक्रम आणि आगामी कार्ययोजना याबाबतही माहिती देण्यात येईल.
सर्व पत्रकारांनी या परिषदेला उपस्थित राहावे असे आवाहन दिलीप पवार, ॲड आय आर घाडी, ॲड एच् एन देसाई, श्री आबासाहेब दळवी, श्री प्रकाश चव्हाण, संजय कुबल, मुरलीधर पाटील, दशरथ बनोशी, महेश गुरव यांच्याकडून करण्यात आले आहे.