#खड्डे बुजविण्याची मागणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ते खानापूर पर्यतच्या रस्त्याची नुकताच झालेल्या पावसामुळे खड्डे पडून रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
त्यामुळे गर्लगुंजी ,निडगल,सन्नहोसुर,भंडरगाळी ,भरगाव तसेच तोपिनकट्टी आदी गावचे नागरीक खानापूरला येजा करतात.यारस्त्यावर पडलेल्या खड्डयामुळे नागरीकासह दुचाकीवरून येजा करणार्या प्रवाशाना खड्ड्यांशी सामाना करावा लागत आहे.
खड्डा चुकविण्याचा नादात आपघात होण्याचा संभव आहे.
तेव्हा संबधीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यानी गर्लगुंजी खानापूर रस्त्याची पाहणी करून खड्ड्यांची दुरूस्ती करावी.
रस्त्याच्या दोन्ही बाजुनी झुडपांच्या दुतर्फा!
गर्लगुंजी खानापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूनी झुडपांच्या दुतर्फा पसरलेल्या आहेत.त्यामुळे वाहन धारकाना वाहने चालविताना झुडपांचा त्रास सहन करावा लागत आहे.तेव्हा संबधित सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यानी रस्त्याच्या बाजुच्या झुडपाचा बंदोबस्त करावा. जेने वाहन धारकाना यांचा त्रास होणार नाही. अशी मागणी गर्लगुंजी गावासह निडगल,
सन्नहोसुर,भंडरगाळी,तोपिनकट्टी, बरगांव आदी गावच्यानागरीकातुन होत आहे.