#सापडलेली १ तोळा सोन्याची चेन परत!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
अलिकडे सोन्याचा एक तोळ्याचा दर एक लाख रूपये हुन अधिक असताना खानापूर येथील स्वामी विवेकानंद पदवीपूर्व काँलेजची विद्यार्थीनी कुमारी वैभवी दळवी हिने काॅलेडच्या पटांगणात सापडलेली एक तोळ्याची सोन्याची चेन प्रामाणिकणा दाखवत काॅलेजच्या प्राचार्याच्याकडे सुपूर्त करण्यात आले . त्याबद्दल काॅलेजमध्ये तिच्या प्रामाणिकपणा बद्दल तिला रोख बक्षिस देऊन तिचा सत्कार करण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खानापूर शहरातील स्वामी विवेकानंद पदवी पूर्व काॅलेजात विज्ञान विभागात शिकणारी वैभवी दळवी हिला काॅलेजच्या पटांगणात १ तोळ्याची १ लाख रूपयाहुन अधिक किमतीची सोन्याची चेन सापडली.
लागलीच सोन्याची चेन कुणाची आहे.याचा शोध घेत काॅलेजच्या कर्मचार्याकडे दिली. यावेळी प्राचार्या पी के चापगावकर यानी सोन्याची साखळी हरविलेल्या विद्यार्थीनी सुपूर्त केले.
यानिमित काॅलेजच्या कार्यक्रमात वैभवी दवळीचा रोख बक्षिस व पुष्पहार घालुन संचालक व समाज सेवक जयंत तिनेईकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाला संस्थेचे सचीव सुहास कुलकर्णी ,संचालक सदानंद कपलेश्वरी,प्राचार्य पी .के.चापगांवकर,उपप्राचार्य एस एस पाटील, प्राचार्य विनोद मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.