#स्वत: गटारी व आजूबाजूला औषध फवारणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच ग्राम पंचायतीचे सदस्य गावच्या प्रगतीसाठी धडपड असताना दिसतात. अशाच प्रकारे बरगांव (ता. खानापूर ) ग्राम पंचायतीचे सदस्य महांतेश महादेव पाटील (भाजप नेते) यानी स्वखर्चाने गावच्या भल्यासाठी औषध फवारणीचा पुढाकार घेऊन एक नवा आदर्श निर्माण केला. हाच आदर्श खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या सदस्यांनी घेतला प्रत्येक ग्राम पंचायत आदर्श ग्राम पंचायत होण्यास वेळ लागणार नाही.
म्हणून बरगांव ग्राम पंचायतीचे सदस्य महांतेश महादेव पाटील यांनी बरंगाव ग्राम पंचायतीच्या वार्ड नंबर एक मधील तसेच खानापूर बरगांव रोडवरील गटारी व आजूबाजूला औषध फवारणी केली.
त्यामुळे गटारीतील दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार.त्यामुळे बरगांव गावच्या नागरीकांतुन समाधान पसरले आहे. तसेच बरगांव ग्राम पंचायतीचे सदस्य महांतेश महादेव पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.