#चापोली ग्रामस्थांची हाक!
संदेश क्रांती नूज:
खानापूर प्रतिनिधी
चापोली (ता.खानापूर ) तालुक्याच्या पश्चिम भागातील अतिदुर्गम व जंगल भागातील अतिपावसाचे गाव अशी या गावची ओळख आहे.
चापोली (ता खानापूर ) येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेची अवस्था अत्यंत जीर्ण व धोकादायक झाली असून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे जीव धोक्यात आले आहेत.
शाळेच्या आवारात तळ्याचे स्वरूप आले आहे
शाळेची सद्यस्थिती :
• इमारतीची अवस्था : भिंतींमध्ये भेगा पडणे, प्लास्टर निघणे, छत व मजले तुटलेले.
• छताची अवस्था : छतातुन गळती सुरू आहे. त्यामुळे वर्ग ओले होतात.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम , विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम तसेच मुलांच्या हजेरीवर परिणाम होत आहे. तेव्हा कार्यवाही होणे आवश्यक आहे.
आमच्या मागण्या :
1. आपण स्वतः शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा.
2. संबंधित विभागांना तातडीने दुरुस्ती व नूतनीकरणाचे काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत.
3. आवश्यक असल्यास शाळेच्या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी निधी मंजूर करावा.
आपण सुध्दा एक शिक्षक होता. तेव्हा लागली याची दखल घेऊन त्वरीत कारवाई करावी.
अन्यथा येत्या काही दिवसात प्रतिसाद न मिळाल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल.असा ईशारा चापोली ग्रामस्थानी दिला आहे.