संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
चापगांव (ता.खानापूर ) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रवेशव्दार यांच्यावतीने गणशे मुर्ती समोर शुक्रवारी दि.५ सप्टेंबर रोजी सत्य नारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सत्यनारायण महापूजेचे मानकरी सौ.व श्री. अशोक आबा पाटील व सौ.मालुबाई अशोक पाटील (ग्राम पंचायत उपाध्यक्षा) होते. यांच्याच हस्ते पुजा संपन्न झाली.
यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
महाप्रसादाला चापगांव गावातील अबाल पासुन वृध्दापर्यतच्या सर्व गणेश भक्तांनी उपस्थिती दर्शवुन महाप्रसादाचा लाभ घेतला.
याप्रसंगी सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष पुंडलिक गंगाराम धबाले तसचे मंडळाचे पदाधिकारी ,पंचमंडळी गावचे नागरीक उपस्थित होते.
