#दुचाकी फेरीचे आयोजन!
#हेल्मेटच्या वापराबात जागरूकता!
संदेश क्रांती न्यूज;
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्या माजी आमदार आणि अखिल भारतीय काॅग्रेस कमिटीच्या सचिव डाॅ.अंजली निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित शुक्रवारी दि. २२ रोजी दुर्गानगर येथील त्यांच्या ‘ रायगड ‘ निवासास्थाना पासुन खानापूर शहरात जनजागृतीसाठी दुचाकी फेरीचे आयोजन करण्यात आले. येथील शिवस्मारक चौकात काॅग्रेस नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होेते.
यावेळी हेल्मेट वापराविषयी जन जागृती करण्यात आली. त्यानंतर शिवस्मारक चौकात माजी आमदार आणि अखिल भारतीय काॅग्रेस कमिटीच्या सचीव डाॅ.अंजली निंबाळकर याना शुभेच्छा देण्यासाठी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष,शहर अध्यक्ष विविध पदाधिकारी ,नगरपंचायतीचे नगरसेवक ,तालुक्यातील ग्राम पंचायतीचेे सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.