संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
श्री स्वामी विवेकानंद पदवी पूर्व काॅलेज,इंग्रजी स्कूल यांच्यावतीने आयोजित ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचा ध्वजा रोहण चेअरमन अँड.चेतन मणेरीकर यांनी केला. या निमित्त नेरसा येथील कन्या सी आर पी एफ मध्ये सेवा बजावत असलेल्या दीपा दळवी हिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की भारतीय सैन्यात भरती होऊन देश सेवेची स्वप्ने भारतीय युवका युवती मध्ये असते. ही स्वप्ने प्रत्येकाच्या जीवनात मिळत नाही. माझे हे स्वप्न पूर्ण झाले. हे माझे भाग्य समजते. असे उदगार केंद्रीय राखीव पोलिस दलात सेवा बजावणार्या दीपा दळवीने काढले.
त्या पुढे म्हणाले की, भारत देश आता पूर्वीचा राहिला नाही. पुरूषाच्या बरोबरीने महिलाना ही समान संधी मिळत आहे. तेव्हा संधीचा लाभ घेताना बाईपण आड यायला देऊ नका .खानापूर तालुक्यातुन अनेक मुलीनी सैन्यात सैन्यात भरती होईन आपले भविष्य उज्वल केले. आता सैन्यात भरती होण्याकडे मुलीचा कल वाढला आहे.
असे मत दीपा दळवी यानी मांडले.
७९ व्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन अँड.चेतन मणेरीकर होते.यावेळी व्यासपीठावर सेक्रेट्ररी सुहास कुलकर्णी,संचालक अँड.मदन देशपांडे,संचालक व समाज सेवक जयंत तिनेईकर,संचालक सदानंद कप्लिश्वरी व प्राचार्य पी.के.चापगावकर,आदी उपस्थित होते.
प्रारंभी प्रा.विनोद मराठे यांनी स्वागत केले.
यावेळीविद्यार्थ्याची ,प्राध्यापकांची ,शिक्षकांची व पाहुण्याची भाषणे झाली. त्यानंतर देशपर भक्ती गीते सादर करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कशिस धामणेकर यानी केले.
यावेळी रांगोळी स्पर्धाचे उदघाटन सीआरपीएफ दीपा दळवी यानी केले.
कार्यक्रमाला संचालक ,विद्यार्थी,प्राध्यापक ,शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.