#सीमाभागातील ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोग करण्याची संधी.!
#सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत मेंढेगाळी गावचे सुपुत्र महाराष्ट्र शासन आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक पांडुरंग काकतकर यांची धडपड!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सीमाभागातील ग्रामीण परिसरात विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोग पाहण्याची व हाताळण्याची संधी मिळावी .तसेच त्यासंबंधी तज्ञांकडून मार्गदर्शन मिळावे. व विज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने गोवा सायन्स सेंटरद्वारे निवडक उपक्रमशील शाळांमध्ये गोवा सायन्स सेंटर, पणजी गोवा येथून सायन्स ऑन व्हील ही बस प्रयोग घेऊन येणार असून प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तज्ञ मंडळी सोबत असणार आहेत. ज्या शाळांना या उपक्रमाचा लाभ घ्यायचा आहे अशा शाळेतील मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेचे नोंदणी करण्यासाठीचे पत्र, gscgoa@gmail.com
या मेल आयडीवर पाठवावे. व त्याची प्रत उपक्रम समन्वयक तथा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ अध्यक्ष पांडुरंग काकतकर 9423512493 यांना पाठवावी. हा उपक्रम महिनाभर चालणार असून त्यासाठी प्रथम नोंदणी केलेल्या शाळांपैकी १५ शाळांची निवड पहिल्या लॉटमध्ये होईल. प्रत्येक शाळेत ही बस दोन दिवस थांबेल त्या दरम्यान त्या शाळेतील विद्यार्थी तसेच परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांनाही प्रयोग हाताळण्याची संधी मिळेल.येत्या ऑक्टोबर/नोव्हेंबर मध्ये नियोजित असलेला हा कार्यक्रम पूर्णतः मोफत असून यासाठी शाळेला कोणताही खर्च करावा लागणार नाही. सीमाभागातील ग्रामीण परिसरात शाळांमध्ये स्वतंत्र प्रयोगशाळा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या विविध प्रयोगांपासून वंचित रहावे लागत असल्याने सदर उपक्रम उपयुक्त आहे.याचा लाभ जास्तीत जास्त शाळांतील विद्यार्थांनी घ्यावा असे आवाहन उपक्रम समन्वयक पांडुरंग काकतकर यांनी केले आहे. उपक्रमात सहभागी शाळांना पुढील काळात वेगवेगळ्या एन जी ओ कडून मिनी सायन्स सेंटर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून सदर शाळेतील उपक्रमशील विज्ञान शिक्षकांचे गोवा, महाराष्ट्र,कर्नाटक असे इंटरस्टेट फोरम करुन त्यासाठी विशेष प्रशिक्षण पणजी येथील गोवा सायन्स सेंटर येथे घेण्याचे नियोजित आहे.