#खानापूर डाॅक्टर असोसिएशच्यावतीने शुभेच्छा!
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील प्रसिध्द दंत वैद्य डाॅक्टर सुनिल शेट्टी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी खानापूर डाॅक्टर असोसिएशनच्या वतीने वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले.यावेळी खानापूर डाॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. डी ई नाडगौडा यानी दंतवैद्य डाॅ. सुनिल शेट्टी कार्याचा आढावा सांगीतला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, दंतवैद्य डाॅ.सुनिल शेट्टी हे खानापूर शहरात एक नामवंत दंतवैद्य म्हणून गेली २० वर्षे प्रामाणिकपणे रूग्णांची सेवा केली. त्याची सेवा अशीच यशस्वी होवो.त्याना शत:युषी लाभो .अशी सदिच्छा दिली.
यावेळी डाॅ. सुनिल पाटील,डाॅ. राम पाटील ,डाॅ.विनायक पाटील (बालरोग तज्ञ), तसेच कृष्णा मेडिकलचे मालक अनंत सडेकर आदी उपस्थित होते.
यावेळी डाॅ सुनिल शेट्टी यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.