“खानापूरात विश्व भारती कला क्रीडा संघटनाच्यावतीने विद्यार्थ्यासह कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकार्याचा सत्कार”
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यानी १२ वी नंतर कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यावे. याचा आदी विचार करून पाय टाकावा. आपली आवड,ध्येय ठेवून पुढे गेला.तर नक्कीच यशस्वी व्हाल. आजच्या युगात विद्यार्थ्याना अनेक मार्ग आहेत. केवळ तुमच्यात जिद्द व चिकाटी हवी. तुम्ही यश खेचून आणाल.असा विश्वास वाटतो.
असे विचार वक्ते गीतन गिंडे यानी विश्वभारती कला क्रिडा संघटेनच्यावतीने आयोजित गुणी विद्यार्थ्याच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंद पाटील होते.व्यासपिठावर विश्वभारती कला क्रिडा संघटनेचे अध्यक्ष अनिल देसाई,समितीचे नेेते विलास बेळगावकर , राष्ट्रपदक विजेत आबासाहेब दळवी, थॅामस डिसोजा,युवा नेते भैरू पाटील,दामोदर कणबरकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलनाने झाली. भैरू पाटील यानी प्रास्ताविक केेले. अनिल देसाई यानी उपस्थिताचे स्वागत केले.
यावेळी इयत्ता १० वी,१२ वी गुणी विद्यार्थ्या सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर खानापूर कुुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकारांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला जोतिबा पाटील,अनिल कालमनकर,कल्लापा पाटील ,गंगाधर गुरव ,अनिता खांडेकर,रेखा देसाई, एलेन बोर्जीस ,कल्पना गाडगीळ,रेणुका शिंदे.कल्पना गावकर आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन टी आर गुरव यानी केले.