संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
पणजी बेळगाव महामार्गावरील खानापूर नवीन बसस्थानकाच्या समोर रस्त्यावरील खड्डे दुरूस्तीसाठी आलेल्या सिमेट मिश्रीत खडीचा टीपर व जेसीबीच्या रस्त्याचे पॅच वर्क करण्याचे काम करण्यात आले.
यावेळी जेसीबीने टीपरमधील खडी टाकण्यात आली. त्यावर जीसीबीने सारवण करून काम केल्याचे दाखवुन बसस्थानकातुन येजा करणार्या लोकाच्या डोळया देखत पॅच वर्क केले.
भर दिवसा बोगस पॅच वर्क करणार्या संबधीत खात्याच्या अधिकार्याना तसेच लोकप्रतिनिधीना ही मनाची नसेल तर जनेतची लाज वाटत नसेल काय? असा सवाल बसस्थानकातुन येणार्या लोकातुन उमटत होता.
प्रसंग होता मंत्री लक्ष्मी हेब्बाळकराचा सासरर्याच्या निधनाचा!
आज बुधवारी खानापूरच्या समादेवी गल्लीतील रहिवाशी,माजी फाॅरेस्ट कंत्राटदार गुरूसिध्दापा हेब्बाळकर यांचे वृध्दपकालीन निधन झाले.
कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्या खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर याचे ते सासरे होत.
खानापूरात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर येणार या भितीने संबधीत खात्याच्या अधिकार्यानी रस्ता पॅचवर्क करण्याचे नाटक केले.
आज खानापूर तालुक्यातील रस्त्याची दैयनिय आवस्था झाली आहे.