#बेकवाडात वारूळाची पूजा केली जाते!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेकवाड ( ता.खानापूर ) येथे नाग चतुर्थी साजरी दरवर्षीप्रमाणे बेकवाड तालुका खानापूर येथे नागपंचमीनिमित्त नाग चतुर्थी दिवशी या ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते गावातील लोक नाग चतुर्दशी दिवशी नवीन आलेल्या वारुळाला पारंपारिक पद्धतीने दूध घालतात व विधिवत पूजा करून नागोबाला साकडे घालण्याचा कार्यक्रम केला जातो तालुक्यात पूर्व भाग वगळता तालुक्यात काही ठिकाणी नागपंचमीला वारुळाला दूध घालण्याची प्रथा आहे पण गेल्या कित्येक वर्षापासून पूर्वापार या बेकवाड गावात वैशिष्ट्यपूर्ण अशी नाग चतुर्थी साजरी केली जाते यासाठी पूजेसाठी परगावाहून देखील लोक हजर असतात लहान मुलांचा हा झोपाळ्याचा खेळ या नाग चतुर्दशी दिवशीपासून नागपंचमी पर्यंत केला जातो या ठिकाणी विधिवत पूजा घालण्याचा कार्यक्रम केला जातो