{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
#गावकर्याना ही याचा होतो त्रास!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
हेम्माडगा (ता.खानापूर ) हा परिसर अतिपावसाचा म्हणुन ओळखला जातो.
त्यामुळे याभागात अनेक समस्या सतत भेडसावित असतात. त्यात प्रामुख्याने रेशन वाटप करताना नागरीकांचे थंम घेताना रेंज मिळत नाही.
तेव्हा हेम्माडगा येथील रेशन दुकानदार चक्क धो पावसात उंच टेकडीवर रेंज मिळविण्यासाठी धडपड असतात.
आदी रेंज मिळुन थंम मिळविण्यासाठी अथक परिश्रम घेतात. मात्र याकडे लोकप्रतिनिधीचे तसेच अधिकारी वर्गाचे साफ दुर्लक्ष असतात.
त्यामुळे याभागातील रेशन वाटपात मोठा गोंधळ निर्माण होतो. नागरीकाना याचा त्रास होतो. याभागातील गरीब नागरीकांना रेशन मिळणे सर्वात गरजेची बाब आहे. मात्र रेंज अभावी मोठी समस्या निर्माण होते.
ऐवढेच नव्हे तर विद्यार्थ्यासाठी अभ्यासाच्यावेळी रेंज मिळविण्यासाठी खुप धडपड करावी लागतेे.
तेव्हा सबंधीत खात्याच्या अधिकार्यानी हेम्माडगा भागात नियमित रेंज मिळावी. यासाठी पर्यत्न करावे. अशी मागणी हेम्माडगा भागातील नागरीकातुन होत आहे.