संदेश कांती न्यूज=
खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथील हेस्कॉम कार्यालयात शनिवारी ग्राहक मिळावा संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंते जगदीश मोहिते उपस्थित होते.
खानापूर शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी ग्राहक मेळाव्यासाठी हे काम कार्यालयाच्या सभागृहात उपस्थित राहून खेडोपाडी होत असलेल्या समस्यांचे विवरण करावे. असे आव्हान हेस्कॉम चे कार्यकारी अभियंते जगदीश मोहिते यांनी केले.
. यावेळी खानापूर तालुक्यातील जवळपास आठ शेतकऱ्यांनी ग्राहक मेळाव्यात सहभाग दर्शविला.
यामध्ये प्रदीप पांडुरंग पाटील कणकीकोप, राजू पारेकर, प्रताप देसाई आदींनी आपल्या समस्या कार्यकारी अभियंते जगदीश मोहिते यांच्यासमोर मांडल्या. यावेळी कार्यकारी अभियंता जगदीश मोहिते यांनी त्यांच्या समस्या ऐकून त्याच्यावर लवकरात लवकर समस्यांचे निवारण करू असे आश्वासन दिले
यावेळी ग्राहक मेळाव्यात हे हेस्कॉम कार्यालयाचे अभियंते एस सी आंगडी, लक्ष्मी रंगनाथ, श्री धर्मदास, जावीर नाईकवाडी, श्री देशपांडे, राजू पारेकर आदी कर्मचारी उपस्थित होते.
आभार श्री. लक्ष्मी रंगनाथ यांनी मांडले