#मोर्चाने तहसील कार्यालयावर शेकडो शिक्षिका उपस्थित!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
आखिल भारत अंगणवाडी नोकर संघटनेच्या माध्यमातुन खानापूर तालुका अंगणवाडी शिक्षिका संघाच्यावतीने बुधवार दि.९ रोजी आपल्या विविध मागण्यासाठी मोर्चाने तहसील कार्यालयावर जाऊन निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की,सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी सेविकांची गौरव सेवा ही नागरी सेवा मानली जावी.तसेच मदतनीस (आया) याना अनुक्रमे सी व डी कर्मचारी म्हणून सेवेत कायम करावे.
- सेवेत रूजू झालेल्या तसेच निवृत्त झालेल्या सर्व अंगणवाडी शिक्षिका व मतदनीस याना ग्रॅज्यूटी देण्यात यावी .
- कर्नाटक राज्य सरकारने आदीच ग्रॅज्यूटी लागु केली आहे.परंतु सदर कायदा लागु करताना सन २०११-१२ मध्ये विभागाच्या सेवेत रूजू झालेल्या आणि निवृत्त झालेल्याचा विचार करण्यात आला नाही. सन २०२३मध्ये निवृत्त झालेल्याचा विचार करण्यात आला.ही ग्रॅज्यटी कायद्याच्या विरूध्द आहे.
- अंगणवाडीला लागु केलेली एफ आर एस प्रणाली सोडुन घ्यावी. फुट टॅक्टरव्दारे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्याला होणारा माणसीक छळ थांबवावा.एफआरएस प्रणाली मध्ये अनेक तांत्रिक समस्या येत आहे. लाभार्थिना अन्न मिळणे गैरसोयीचे होत आहे. एफ आर एस प्रणाली केवासी पडळतानी ओटीपी या गोष्टी नेटवर्कमुळे समस्या उदभवत आहे. तर समस्या सोडविण्याऐवजी अधिकारी शिस्तभंगाची कारवाई करण्याची धमकी देत आहेच.
- अंगणवाडी शिक्षिकाना मानधन देणारी पध्दत बंद करावी.सरकारी किमान वेतन निश्चित करून त्याना रक्कम द्यावी
- केंद्र सरकारने २०१८ पासुन मानधन वाढ केली नाही. त्यामुळे केंद्रसरकारने मानधन वाढविण्यासाठी पावले उचलावी.
- इतर राज्यात अंगणवाडी कमर्मचार्याचे ६५ पर्यत आहे ते आम्हाला ही करावे.
- अशा एकूण १० मागण्या निवेदना व्दारे करण्यात आल्या
यावेळी निवेदनाचा स्विकार उपतहसीलदार रमेश बुवा यानी केला व सरकारकडे पाठवुन देण्याचे आश्वासन दिले
यावेळी अंगणवाडी संघटनेचे पदाधिकारी मेघा मिठारी ,भारती पै,अनिता पाटील, रूक्मिणी हलगेकर,लता पाटील ,प्रमिळा नाकाडी,सरीता पेडणेकर आदी पदाधिकार्यासह शेकडो अंगणवाडी शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.