संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बैलूर (ता.खानापूर ) ते बैलूर क्राॅस रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे यारस्त्यावरून वाहन चालक व प्रवाशी यानी ये जा करताना वैतागले आहेत.
या रस्त्याच्या दुरूस्ती साठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्याकडे अर्ज विनंत्या करून ही संबधीत अधिकार्यानी दुरूस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे.
यासंदर्भात खानापूर तालुका ग्राम पंचायत युनियनचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यानी येत्या चार दिवसात बैलूर रस्त्याची दुरूस्ती केली नाही तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाचे टोळे टोकु कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी निधी ही मंजूर झाला आहे. पावसाळ्यापूर्वी कामाच्या शुभारंभाचा नारळ ही फोडण्यात आला. त्यामुळे या रस्त्याच्या खड्डयांची दुर्दशा संपणार अशी अशा बैलुर भागातील नागरीकाना होती.
परंतु कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे हे काम करण्यास विलंब झाला.आणि आज या पावसाळ्यात बैलूर रस्त्याची दैयनिय आवस्था झाली आहे.
येत्या चार दिवसात यारस्त्याची दुरूस्ती नकेल्यास बैलूर भागातील नागरकासह सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालया समोर उपोषणाचा इशारा खानापूर तालुका ग्राम पंचायत युनियनचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यानी दिला आहे.