#ऐन पावासाळ्याच्या तोंडावर कामाला प्रारंभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर खानापूरअसोगा रस्त्यावरील रेल्वे स्टेशन जवळ कंत्राटदाराने हलगर्जीपणाने भूयारी मार्गाचे काम सुरू केल्याने त्यातच पावसाचा जोर वाढला . तर भुयारी पुलासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयाला तलावाचे स्वरूप आले. जोरदार पावसामुळे हा रस्ता रेल्वेस्थानकाजवळ खड्डयात कोसळत चालला. त्यातच अतिवृष्टीमुळे हालात्री नदीवरील पुल वाहतुकीस बंद झाल्याने गोव्याहुन होणारी अवजड वाहतुक असोगामार्गे सुरू झाली .आवजड वाहतुकीमुळे खानापूर असोगा रस्त्यावरील रेल्वेस्टेशनजवळील रस्त्याचा काहीभाग खड्यात कोसळला आहे.
त्यामुळे कंत्राटदाराने सध्या तात्पूरती व्यवस्था म्हणून पोत्यात रेती भरून कोसळणार्या रस्त्याला भरावाला टेकू दिला आहे.मात्र दिवसेदिवस पावसाचा जोर वाढत जाणार पुन्हा रस्ता ढासळत जाणार त्यामुळे खानापूर असोगा रस्ता धोकादायक ठरणार त्यामुळे रेल्वे प्रशानाचे नियोजन कुचकामी ठरले आहे.त्यातच कंत्राटदाराचा हलगर्जीपणा दिसुन आला आहे.
अवजड वाहतुक सुरू झाल्यास यारस्त्याची दुर्दशा होऊन भोसगाळी,मन्सापूर,असोगा, मणतुर्गा, गावच्या नागरीकांची हाल होणार आहेत.
#लोकप्रतिनिधी शाहणे नसतात!
रस्त्याची पुलांची ,भुयारी मार्गाच्या कामांचा शुभारंभाचा नारळ वाढवुन कामाला चालना देताना कोणत्या काळात कोणती कामे सुरू करावे.याचे शाहणपणे लोकप्रतिनिधा नसते का? याचे उदाहरण म्हणजे खानापूर असोगा रस्त्यावरील रेल्वेस्टेशन जवळील भूयारी मार्गाचे काम होय.