गर्लगुंजी ( ता.खानापूर ) गावचे ग्रामदैवत श्री माऊली देवीची यात्रा सालाबाद प्रमाणे यंदा ही मंगळवारी दि. २९ एप्रिल ते २ मे पर्यत होत आहे. मंगळवारी दि २९ रोजी यात्रेचा पहिला दिवस असुन मंगळवारी सकाळी गावातील देवदेवतांची विधीवत पुजा होऊन सायंकाळी गावातुन पालखी वाजत गाजत माऊली मंदिराकडे प्रस्थान झाली. त्यानंतर ग्रामदेवता माऊली देवीची विधीवत पुजाआर्चा होऊन गार्हाणे घालण्यात आले.
आज बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस बुधवारी पहाटे मानकर्याच्या घरातून सुवासिनी वाद्याच्या निनादात आरती घेऊन माऊली मंदिराकडे प्रस्थान झाल्या. यावेळी सकाळी माऊली देवीला अभिषेक ,विधीवत पुजा होेऊन सुवासिनी कडुन आरती होऊन इंगळ्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ झाला. यावेळी हजारो भाविकानी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मंदिरा पासुन गावापर्यत वाहनाची एकच गर्दी झाली.त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. रात्री गावात संग्या बाळ्या नाट्यप्रयोग मनोरंजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.