
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथील केएलई सोसायटीचे एम एस होसमणी पदवी पूर्व विद्यालयाचा विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील परीक्षेचा निकाल उत्तमरीत्या लागला असून, कॉलेजचा एकूण निकाल ८५.४९% लागला आहे. या कॉलेजची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी लक्ष्मी एन पाटील हिने विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक पटकाविला असून, तीने बायोलॉजी विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत.
विज्ञान शाखा परीक्षेचा निकाल..
विज्ञान शाखा विभागातून लक्ष्मी एन. पाटील हीने ९६% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर अपूर्वा कोडोळी हिने ९१.१६ % मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर पवित्रा चौगले हिने ८६ % मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. प्रणाली दिनकर मरगाळे हिने ८५.३३% गुण, आणि मोहम्मद अयान तिगडी यांने ही ८५.३३ टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक पटकाविला आहे.
वाणिज्य शाखेचा परीक्षेचा निकाल..
वाणिज्य विभागातून निवेदिता एन पाटील हिने ९३.६६% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, प्रगती कलाल हिने ९१%, गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तर रेश्मा गावडा हिने ८६.६६़% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. सुनीता रायप्पागौडर हिने ८५.५% गुण मिळवून चौथा क्रमांक पटकाविला आहे. आणि मिस लोरेटा एल. मेनेझेस हिने ८२.८३ % गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकाविला.
या विद्यार्थ्यांना, केलई कॉलेज एलजीबीचे अध्यक्ष आर डी हंजी तसेच सर्व एलजीबी सदस्य व प्राचार्य विजय एम कलमठ तसेच कॉलेजचे सर्व प्रोफेसर वर्गाचे सहकार्य लाभले आहे. या सर्वांच्या वतीने, कॉलेजचे प्राचार्य विजय एम कलमठ यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.