
#कर्नाटक दलित संघर्ष समिती ,भिमवाद यांच्या सौजन्याने!
#उद्या कार्यक्रमाचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी ( ता. खानापूर ) येथे कर्नाटक दलित संघर्ष (रि) भिमवाद यांच्या सौजन्याने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळा मुर्तीचे व शाखेचे उदघाटन उद्या शुक्रवारी दि २९ रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे.
कार्यक्रमाला खासदार विश्वेश्वर कागेरी हेगडे, माजी आमदार अरविंद पाटील,बसवराज रायबगोळ अध्यक्ष बेळगाव जिल्हा नौकर संघ,
प.पू.रामदास महाराज, चांगाप्पा निलजकर,विठ्ठल करंबळकर, महादेव बांदेवाडकर, तसेच भाजपचे नेते, व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून भाजप नेते संजय कुबल हे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी ग्राम पंचायत अध्यक्ष नारायण गुरव हे करणार आहेत.
तरी कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन कर्नाटक दलित संघर्ष समिती भिमवाद यांच्यावतीने करण्यात आले आहे.