
जिल्हा,तालुका आदर्श पुरस्कार मिळालेल्या शिक्षक,शाळाचा सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने रविवारी (ता. १५) शिव स्मारक येथे सकाळी अकरा वाजता जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले शिक्षक व आदर्श शाळांचा सन्मान केला जाणार आहे.
दरवर्षी समितीच्यावतीने मराठी माध्यमाच्या शिक्षकांचा सन्मान केला जातो यावर्षीही शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेल्या शिक्षक व आदर्श शाळांचा सन्मान केला जाणार असून कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे व बेळगाव तालुका समितीचे सरचिटणीस ऍड एम जी पाटील उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिक्षकांसह मराठी भाषिकानी आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई व सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.