संदेश क्रांती न्यूज:
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या शिशु व माता हाॅस्पिटल नुतन इमारतीचा उदघाटन सोहळा बुधवारी दि .११ रोजी ११ वाजता होणार आहे.
यावेळी उदघाटन कार्यक्रमाला राज्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव, व पालकमंत्री सतीश जारकिहोळी ,आमदार विठ्ठलराव हलगेकर व इतर मान्यवर उपस्थिती राहणार आहेत.
आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली उदघाटन सोहळा होणार आहे.
या हाॅस्पिलमध्ये ६० बेडची सोय असुन ५० बेड बाळंतीणसाठी तर १० बेड नवजात शिशुसाठी तयार आहेत.
हाॅस्पिटलसाठी सर्व सोयी उपलब्ध !
खानापूर हाॅस्पिटलसाठी सर्व उपकरणे व सामग्रीही उपलब्ध झाली आहे.ग्रुप डी कर्मचारी,तसेच डाॅक्टरांची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करून कामाला सुरूवात होणार आहे.त्याचबरोबर दोन डायलिसिस मशीनची सोय केली जाणार आहे.
याजबरोबर सरकारी दवाखान्याची जुनी इमारत जीर्ण झाली असुन त्याच ठिकाणी नव्या जनरल हाॅस्पिटलसाठी जवळ पास३५ कोटी रूपये मजुंर झाले असुन लवकरच कामाचा शुभारंभ होणार आहे.
या इमारतीमध्ये १०० बेडची तीन मजली इमारत उभी करण्यात येणार आहे.
याकामी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.महेश कोणी,तालुका आरोग्य अधिकारी महेश किवडसन्नावर,डाॅ.नारायण वड्डिन्नावर आदीनी नवीन हाॅस्पिटलची पाहणी करून बुधवारी होणार्या उदघाटन कार्यक्रमाची माहिती घेतली.
तरी कार्यक्रमाला तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी केले आहे.