# रुपये 25000 ते 2100 रुपये पर्यंत बक्षीस!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील केंचापूर गल्लीत कार्तिकोत्सवा निमित्त शनिवार दिनांक 22 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर पर्यंत संगीत भजनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी दिनांक 22 रोजी सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या होणार आहे.
विजय स्पर्धकांना अनुक्रमे रुपये 25000, रुपये 18000,रुपये 15000, रुपये12000,
रुपये 10000,रुपये8000, रुपये 6000, रुपये 4000 , रुपये 3000, रुपये 2100 व चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर वैयक्तिक उत्कृष्ट गायक हार्मोनियम तबला व मृदंग वादकांना प्रत्येकी 1101 रुपये व चषक देण्यात येणार आहेत.
तरी भजनी मंडळ याचा लाभ घ्यावा. असे आव्हान आयोजकाने केले आहे.
