
नगरपंचायतीची कचरा गाडी चिखलात रूतली!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील ):
खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात अनेक वर्षापासुन समस्यांचा डोंगर आहे.मात्र याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असुन अधिकार्याचे डाळेझाक होत आहे.
सध्या विद्यानगरात चिखल्लाचे साम्राज्य!
यंदाच्या पावसात जुन पासुनच विद्यानगरात चिखल्लाचे साम्राज्य पसरले आहे.
याचे खरे कारण म्हणजे विद्यानगरात गटारीच नाहीत.त्याचबरोबर रस्ताच नाही. त्यामुळे यंदाच्या मुसळधार पावसात योग्य रस्ता व गटारी नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने रस्त्यावर पाणीच पाणी साचत आहे.
पाणी साचल्याने वाहतुकीमुळे रस्त्यावर चिखल्लाचे साम्राज्य पसरले आहे.
नगरपंचायतीची कचरागाडी रूतली!
रोज सकाळी येणारी नगरपंचायतीची कचरा गाडी नुकताच चिखलात रूतून बसली.त्यामुळे स्वच्छता कामगाराना याचा त्रास होत आहे.त्यामुळे स्वच्छता कामगार वैतागले आहेत.
शालेय विद्यार्थ्याना ,महिलाना ,वृध्दाना घराबाहेर पडणे मुष्कील!
विद्यानगरात राहणार्या कुटूंबातील शालेय विद्यार्थ्याना,महिलाना ,वृध्दाना घराबाहेर पडताना रस्त्यावरील चिखल्लाची भिती वाटत आहे.तर शाळकरी मुलाना जाताना चक्क चिखल्लातच चप्पल अडकुन बसल्याने व चिखल्लाने शाळेचा ड्रेस घाण झाल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.महिला ,वृध्दाना घराना घराबाहेर पडणे मुष्किल झाले आहे.
नगरसेवक फिरकतच नाही.
विद्यानगरात अनेक समस्या आहेत. रामगुरावाडी ग्रामपंचायत हद्दीतील घराचे पाणी विद्यानगरच्या रस्त्यावरून वाहत आहे.
याबाबत कोणतीच दखल घेतली नाही.
की समस्येबाबत विचरणा होत नाही.
त्यामुळे रहिवाशातुन नाराजी पसरली आहे.
आमदारानी रस्त्यासाठी प्रयत्न करावे.
विद्यानरात रस्ता नाही.गटारी नाहीत .यासाठी तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी
विद्यानगरातील रस्त्यासाठी निधी मंजुर करून रस्ता,गटारीची कामे करावी .अशी मागणी विद्यानगरातील रहिवाशातुन होत आहे.