
#वयोवृध्द महिलाशी संपर्क साधुन जाणुन घेतल्या आडचणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
सावरगाळी ( ता. खानापूर ) गावाला.खानापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यानी सोमवारी जाऊन पंच हमी योजनेबद्दल कर्नाटक सरकारकडून येत असलेल्या अनुदान तसेच इतर सुविधा याच्याबद्दल तसेच गृहलक्ष्मी योजनेबद्दल घरोघरी जाऊन महिलांना या योजनेचा लाभ होतोय की नाही याची पडताळणी करण्यासाठी महिला मंडळाची तसेच वयोवृद्ध महिला व नागरिक यांच्याशी थेट त्यांच्या घरी जाऊन संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तसेच गावातील एच एल जमिनी बद्दल अडीअडचणी ऐकून घेऊन त्या माजी आमदार अंजलीताई निंबाळकर यांच्यामार्फत सरकार दरबारी सोडवण्याचे आश्वासन खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी गावकऱ्यांना दिले व खानापूर तालुक्यात गेल्या वर्षभरात जंगली हत्तीने धुमाकूळ घातलेला आहे त्या संदर्भात त्यांनी थेट आयसीसीच्या सेक्रेटरी व माजीआमदार डाॅ. अंजलीताई निंबाळकर यांच्या कानावर घालून बेंगलोर येथे वनमंत्र्यांच्या उपस्थितीत ताईने त्याचा आवाज उठवलेला आहे. तेव्हा हत्तीचा बंदोबस्त व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी अशी विनंती वजा आदेश आर एफ ओ एसीएफ यांच्याशी गावकऱ्यांच्या समक्ष फोन वरून तंबी तंबी देण्यात आली व हत्तीचा बंदोबस्त करण्याची विनंती केली
यावेळी यावेळी गावातील शांताराम गुरव प्रमोद गुरव ,राजू पाटील ग्रामपंचायत सदस्य शेंदोरी व महिला व युवक व इतर गावातील ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिक शेकडोच्या संख्येने उपस्थित होते व याच्याबद्दल परत काही अडचण आल्यास काँग्रेस काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी सदैव राहील व तशा काही अडचणी आल्यास आपणाला संपर्क साधावा असे आश्वासन त्यांना दिले तसेच तालुक्यात कोणत्याही गावाला कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास आपल्याशी संपर्क साधावा.असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्यासोबत खानापूर तालुका ग्रामपंचायत संदस्य संघटनेचे अध्यक्ष तसेच निलावडा ग्रामपंचायत सदस्य व खानापूर तालुका लँड ट्रिब्युनल मेंबर विनायक मुतगेकर हे उपस्थित होते.
वयोवृध्द महिलेशी अँड घाडी यांचा संपर्क!
तसेच गावातील वयोवृद्ध महिलेने त्यांच्याशी थेट त्यांच्या घरी जाऊन संपर्क साधताना जी सरकारचे पंचमी योजना आहे ही योजना कर्नाटक काँग्रेस सरकार व खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर सेक्रेटरी नवी दिल्ली यांचे मी आभार मानत आहे व त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून या योजनेबद्दल राज्यातील व तालुक्यातील महिलांचे सार्थक झाले त्यामुळे मी कर्नाटक काँग्रेस सरकारचे व डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांचे मी मनःपूर्वक आभारी आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली