
# क्रीडाज्योत पेटवून स्पर्धाना प्रारंभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील सर्वोदय इंग्लिश मिडियम स्कूलच्या सन २०२४ – २५ सालाच्या वार्षिक क्रिडा स्पर्धाना नुकताच प्रारंभ झाला.
क्रीडास्पर्धा उदघाटनच्या अध्यक्षस्थानी डाॅ.रेव्ह.मायकेल उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते इरफान तालिकोटी, प्राचार्या फादर नेल्सन पिंन्टो,फादर जेम्स राजन , मुख्याध्यापिका मिस. कोनीता,एस एस बदामी नंदगड, आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवराच्याहस्ते क्रिडाज्योत पेटवुन क्रिडास्पर्धाना प्रारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना डाॅ.रेव्ह.मायकेल म्हणाले की ,सर्वोदय इंग्लिश मिडियम स्कूलच्या खेळांडुनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यत यश संपादन करून सर्वोदय हायस्कूलचे नाव ,तालुक्याचे नाव प्रसिध्द केले.
तेव्हा विद्यार्थ्यानी आपल्या जीवनात तत्व ठेवून जीवनाची वाटचाल करा. नक्कीच यशस्वी व्हाल.असे सांगीतले.
सर्वोदय इग्लिश मिडीयम हायस्कूलच्या पटांगणावर पार पडलेल्या क्रिडा स्पर्धा चार रंगाच्या लाल,हिरवा,निळा,आणि पिवळा हाऊस मध्ये आकर्षित मार्चफास्ट व पाहुण्याना मानवंदना देऊन क्रिडास्पर्धाचा प्रारंभ करण्यात आला.
क्रिडास्पर्धा पार पाडण्यासाठी शिक्षकानी परिश्रम घेतले.